InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

उत्‍तर प्रदेशमध्ये विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पर्जन्यवृष्‍टी- १५ जणांचा मृत्‍यू

उत्‍तर प्रदेशमध्ये गेल्‍या तीन दिवसांपासून विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पर्जन्यवृष्‍टी होत आहे. या पावसामुळे १४ जिल्ह्यांतील १५ जणांचा मृत्‍यू झाला आहे.

 

गेल्‍या ९ जुलै ते १२ जुलै या चार दिवसांमध्ये झालेल्‍या जोरदार पावसामुळे १५ जणांचा मृत्‍यू झाला आहे. २३ जनावरे या पावसात दगावली आहेत, तर १३३ इमारतींची पडझड झाल्‍याचे समोर आले.

वादळी पावसाचा तडाखा बसलेल्‍या जिल्ह्यांमध्ये उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हरदोई, खीरी, गोरखपूर, कानपूर नगर, पीलिभीत, सोनभद्र, चंडोली, फिरोजाबाद, मऊ आणि सुलतानपूर यांचा समावेश आहे.

अजून दोन दिवस ढगाळ वातावरणच राहणार असून विजांच्या गडगडाटासह आज शनिवारी आणि पुढील चार ते पाच दिवस लखनौमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्‍त्र विभागाने वर्तविला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply