InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु

- Advertisement -

मुंबईतील विविध भागात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई शहर तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. लालबाग, वरळी, सायन, वडाळा वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, घाटकोपर, बोरिवली दहिसरमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. पालघर, ठाणे, भिवंडी परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. ठाणे, भिवंडीतही विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु आहे. महा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस सुरु झाला.

मुंबईसह अनेक भागात दिवसभर पाऊस राहिल तर उद्या पाऊस उघडीप देईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. महा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. 2019 मध्ये पावसाचं ऋतुचक्र बदलल्याचं चित्र आहे. यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही पाऊस बरसत आहे. यावर्षी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातही पाऊस थांबण्याचं काही नाव घेत नाही.

Loading...

आजचा पाऊस नोव्हेंबर 2010 मधील पावसाचा विक्रम मोडणार असंच दिसत आहे. नोव्हेंबर 2010 मध्ये 47.2 मिमी पाऊसाची नोंद झाली होती. या महिन्यात मुंबईत आतापर्यंत 46 मिमी पाऊस पडला आहे.

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.