“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

पुणे: केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. कोकणात महापुरानं मोठं नुकसान झालं आहे.

अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही आज कँम्प राबवतोय. राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे, असं सांगतानाच पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केलं जाईल. पॅकेज जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. कोकणात पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भिती आहे. त्यामुळे आम्ही कॅम्प राबवतोय, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा