Hera Pheri 3 | “राजूची भूमिका फक्त…”; अक्षय कुमारच्या अनुपस्थितीवर सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

Hera Pheri 3 | मुंबई: दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हेरा फेरी (Hera Pheri) हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून त्याची ओळख आहे. हेराफेरी या चित्रपटाचा प्रथम भाग 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांची मनोरंजनाचे बादशाह म्हणून ओळख निर्माण झाली होती. तर या फ्रेंचाईजीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी 2’ 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता.

दरम्यान, हेरा फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aryan) अक्षय कुमारची जागा घेणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. सुनील शेट्टीने कार्तिक आर्यनच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला आहे की,”राजूची भूमिका फक्त अक्षय कुमार करू शकतो. कार्तिक आर्यन या चित्रपटामध्ये असला, तर तो पूर्णपणे नव्या भूमिकेत दिसेल. कारण राजूची भूमिका फक्त अक्षय कुमारच करू शकतो.”

पुढे बोलताना तो म्हणाला की,”हेरा फेरीला 14 वर्षे उलटून गेली आहे. पण चाहत्यांना तो कालचा चित्रपट आहे असे वाटते. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षांवर उतरणे, हे आमच्यासाठी खूप मोठे काम आहे.” हेरा तेरी या चित्रपटाचा तिसरा भाग अक्षय कुमार शिवाय होऊ शकत नाही, असे देखील चाहत्यांकडून म्हणण्यात आले होते. यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर #noakshaykumarnoherapheri मोहिम सुरू केली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटानंतर अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हेरा फेरी 3 मध्ये परत धुमाकूळ घालताना दिसणार आहे. अक्षय कुमार परत एकदा राजूची भूमिका साकारेल असे दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसापासून जगभरातून मिळालेल्या चाहत्यांच्या प्रेमाखातर आणि सुनील शेट्टीच्या प्रतिक्रियेनंतर अक्षय कुमार हेरा फेरी 3 मध्ये परतू शकतो.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.