इथं पण पंगा : ‘धाडक’ सिनेमाच्या सेटवर कंगनाने केली दोन व्यक्तींसोबत फायटिंग

मुंबई : बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना रणौत सध्या तिच्या आगामी सिनेमा ‘धाकड’चं शूटिंग करत आहे. नुकताच कंगनाने तिच्या सिनेमाचा एका बीटीएस व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिलंय. “लडाकू नंबर वन”. या व्हिडीओत कंगना दोन व्यक्तींसोबत फायटिंग करताना दिसतेय.

‘धाडक’ सिनेमा एक अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा असून या सिनेमात कंगना अर्जुन रामपालसोबत झळकणार आहे. या सिनेमात कंगना गुप्तहेराची भूमिका साकारणार असून ‘एजंट अग्नी’ असं तिचं नाव असणार आहे. या सिनेमात भरपू अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळाणार आहे.

तसेच हॉलिवूडमधील नावाजलेले अ‍ॅक्शन दिग्दर्शक हे अ‍ॅक्शन सीन दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनिश घई करत असून सोहेल मकलाई याची निर्मिती करणार आहेत. पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

‘धाकड’सोबतच कंगना ‘थलायवी’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमा तयार असून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. तर दुसरीकडे कंगनाने ‘तेजस’ या सिनेमाच्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केलीय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा