Hero Bike Launch | हिरो Xpulse 200T 4V लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Hero Bike Launch | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची दुचाकी (Bike) उत्पादक कंपनी हिरो (Hero Motocorp) नेहमी नवनवीन वैशिष्ट्यसह बाजारांमध्ये बाईक लाँच करत असते. त्यामुळे हिरोची लोकप्रियता देशामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अशात कंपनीने हिरो Xpulse 200T 4V बाईक लाँच केली आहे. ही बाईक नवीन मॉडेलसह अधिक प्रगत आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये आहे.

इंजिन

हिरो Xpulse 200T 4V या बाईकमध्ये 200cc BSVI वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 8,500rpm वर 19.1PS पॉवर आणि 6500rpm वर 17.3Nm टार्क निर्माण करू शकते. या बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बाईकमध्ये 37mm फ्रंट फोर्स आणि मागच्या बाजूला 7-स्टेप ऍडजेस्टेबल मोनो-शॉक स्पेसिफिकेशन दिले आहे.

फीचर्स

हिरो Xpulse 200T 4V ही बाईक बाजारामध्ये तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शील्ड गोल्ड या रंगांचा समावेश आहे. या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अंडर-सीट यूएसबी चार्जर, गियर इंडिकेटर आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि फूल डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.

स्पेसिफिकेशन

हिरो Xpulse 200T 4V या बाईकमध्ये सिंगल-चॅनल ABS बरोबर 276mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 220mm रियल डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये 17-इंच कास्ट-अॅलॉय व्हील देखील देण्यात आले आहे.

किंमत

हिरो Xpulse 200T 4V या बाईकची कंपनीने एक्स-शोरूम किंमत 1,25,726 रुपये एवढी ठेवली आहे. ही बाईक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या Honda CB 200X या बाईकसोबत स्पर्धा करू शकते.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.