InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गुजरातमध्ये हाय अलर्ट; शाळा- महाविद्यालये बंद

- Advertisement -

वायू’ चक्रीवादळ 13 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश शहा यांनी दिले. तसेच यादरम्यान वीजसेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

दरम्यान, शाह यांनी आपात्कालिन नियंत्रण कक्षाला 24 तास अलर्ट राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच एनडीआरएफच्या 26 टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी 10 टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीदेखील आपात्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रूपाणी यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. तसेच ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवू शकतो अशा 10 जिल्ह्यांमध्ये 13 आणि 14 जून रोजी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याची घोषणा केली. दरम्यान, आपण ओदिशा सरकारशीही संपर्कात असून फॅनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी त्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या होत्या याची माहिती घेत असल्याचेही सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.