राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला हायकोर्टाकडून दिलासा

मुंबई : राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी होणार होती. या सुनावणीत राज कुंद्राच्या याचिका फेटाळत राजला न्यायालयाने 14 दिवसाची कोठडी वाढवली आहे. मात्र याच प्रकरणातील अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दोघांना अटकपूर्व जामीन देखील मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शर्लिन चोप्राला चौकशीसाठी समन्स पाठवले होते. बातमीनुसार शार्लिनला सकाळी 11 वाजता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. शार्लिन चोप्राने महाराष्ट्र सायबर सेलमध्ये आपले निवेदन नोंदवले आहे. ती म्हणाली होती की, “या प्रकरणात आवाज उठवणारी मी पहिली व्यक्ती होते. तिने सांगितले होते की, मला सायबर सेलने बोलावल्यानंतर मी भूमिगत झाले नाही किंवा हे शहर सोडून पळून देखील गेले नाही”.

अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे हिने देखील राज कुंद्रा प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत. आपल्याला एका करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले होते, असे तिने म्हटले होते. जेव्हा त्याने असे करण्यास नकार दिला, तेव्हा तिच्या वैयक्तिक गोष्टी लीक करण्याची धमकी देण्यात आली असल्याचे पूनम पांडेने सांगितले होते.

दरम्यान या दोघींवर 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, असा देखील न्यायालयाने निर्णय जारी केला आहे. यामुळे काही कालावधीपर्यंत तरी या दोघींना दिलासा मिळाला आहे. मात्र या पुढे राज कुंद्रा प्रकरणात काय खुलासे होतात यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा