InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

टिकटॉकवर परत बंदी; उच्च न्यायालयात याचिका दाखल

- Advertisement -

टिकटॉक या मोबाईल अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिना दरवेश या मुंबईतील गृहिणीकडून टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तीन मुलांची आई असलेल्या हिना यांचा आरोप आहे की, टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. या अॅपमध्ये अश्लील व्हिडीओ अधिक असतात. या व्यंगात्मक व्हिडीओजमुळे तरुणाईत आत्महत्यांचं प्रमाणदेखील वाढत आहे. तसेच यात अनेकदा जातीवाचक मुद्यांवरही व्हिडीओ प्रसारित केले जातात, ज्यामुळे देशात जातीयवाद भडकू शकतो.

टिकटॉक हे एक चायनीज मोबाईल अॅप्लिकेशन असल्याने यामागे भारताविरोधात छुपा मनसुबाही असू शकतो, अशी शक्यता या याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. टिकटॉकवरील व्हिडीओजमुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन होत आहे. ज्याचा एकंदरित परिणाम देशाच्या विकासावरही होत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. हिना दरवेश यांनी अॅड. अली काशिफ खान यांच्यामार्फत दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.