InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हिमा दासचे 11 दिवसांतील तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक

धावपटून हिमा दासनं झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृत अथेलेटिक्स  स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. हिमाचे हे मागील 11 दिवसांतील तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ठरले. आसाममधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमानं गतवर्षी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. त्यानंतर तिच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले.

पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत असलेल्या हिमानं 23.65 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तिीनं कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेती 23.97 सेकंदाची वेळ नोंदवून एका सुवर्णपदकाची कमाई केली. त्यात रविवारी हिमानं 23.43 सेकंदाच्या वेळेसह आणखी एक सुवर्णपदक नावावर केले.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply