Himesh Reshammiya | ‘Badass रविकुमार’ चित्रपटाचा टीजर रिलीज, हिमेश रेशमियाचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन

टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड (Bollywood) मधील मशहूर संगीतकार (Musican) आणि गायक (Singer) म्हणून हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याने लोकप्रियता मिळवली आहे. त्यानंतर त्याने अभिनयामध्येही आपला हात आजमावला होता. पण अभिनेता म्हणून हिमेश रेशमियाला फारसे यश मिळाले नाही. सध्या तो सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या इंडियन आयडल 13 या सिंगिंग रियालिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. त्याचवेळी अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाची शूटिंग देखील करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हिमेश रेशमिया चित्रपटसृष्टी मध्ये पुनरागमन करणार आहे.

हिमेश रेशमिया(Himesh Reshammiya) चे चित्रपटसृष्टीत पुनरागमन

‘Badass रविकुमार’ या चित्रपटा द्वारे हिमेश रेशमिया बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटाचा टीजर व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे. यासोबतच त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ” ‘Badass रविकुमार’ या चित्रपटासह हिमेश रेशमिया चित्रपट सृष्टीत पुनरागमन करत आहे. या चित्रपटात हिमेश रेशमिया vs 10 खलनायक आहेत: TheXpose फ्रेंचायझीचा पुढचा भाग… शीर्षक BadassRaviKumar. ..शीर्षक घोषणा टीझर पहा…”

‘Badass रविकुमार’ ट्रेलर लवकरच होणार रिलीज

आदर्श तरुण यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओचे कॅप्शन मध्ये पुढे लिहिले आहे की, ” ‘Badass रविकुमार’ हा ॲक्शन एंटरटेनर चित्रपट असणार आहे. हा चित्रपट ॲक्शन आणि कॉमेडी प्रेमींसाठी आहे. तर, या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री डायरेक्टर आणि 10 खलनायक सस्पेन्स मध्ये ठेवले आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे पहिले गाणे ‘बटरफ्लाय तितलिया’ आणि ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल.” या चित्रपटाची निर्मिती हिमेश रेशमियाने केली असून या चित्रपटाची कथा आणि संगीतही हिमेश रेशमियानेच केले आहे.

‘Badass रविकुमार’ चित्रपटाचा टीचर

‘Badass रविकुमार’ या हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटाचा टीचर दमदार दिसत आहे. तर त्याचबरोबर या टीचर मध्ये ॲक्शनसह इंटरटेनमेंटही दिसत आहे. हिमेश रेशमियाच्या जबरदस्त लुकसह हा टिजर रिलीज झाला आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षीच म्हणजे 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.