‘हिंदू लोकांमध्ये एक कमजोरी, त्यांना आपले आणि परके कोण हा भेद कळत नाही’

हिंदू समाजातील लोकांमध्ये पूर्वीपासूनच एक कमजोरी आहे. त्यांना आपले आणि परके कोण हा भेद कळत नाही. देश, देव आणि धर्म हे हिंदू लोकांच्या रक्तातच नसते. सध्याच्या घडीला हिंदू समाज राष्ट्रवादाला मारक भूमिका घेत आहे, अशी टीका श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी केली.

अमेरिकेने एकादशीला यान सोडले म्हणून यशस्वी झाले – संभाजी भिडे

हा कायदा देशहिताचा आहे. हे पूर्वीच व्हायला पाहिजे होते. स्वातंत्र्याच्या नावाखाली या कायद्याला विरोध करणे योग्य नाही. हे अतिश्य घातक आहे. आतादेखील देशातील सुशिक्षित हिंदू लोकांनी या कायद्याविरोधात घेतलेली भूमिका ही राष्ट्रवादाला मारक आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले.

‘हेलपाटे न घालता कर्जमाफी आम्ही देऊ’; जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार

यावेळी संभाजी भिडे यांनी मुस्लिम समाजाविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केले. मुसलमान या देशाचे नागरिक आहेत, असे आपण कितीही म्हटले तरी ते खरे नाही. ते राहतात इकडे आणि कौतुक इतराचे करतात. यासाठी मराठवाड्यात एक म्हण आहे. ‘खायचं कणगीचं आणि गायच इरलीचं’, अशी देशातील मुस्लिमांची तऱ्हा आहे. मुळात जिथे हिंदुंमध्ये राष्ट्रीयत्व नाही तर ते मुस्लिमांमध्ये कुठून येणार, असे भिडे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.