भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ तारखेपासून होणार कसोटीला सुरूवात

जगात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊन देखील वाढत आहे. याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम पाहायला मिळत आहे. पण आता गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ; राणेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा

आता ICC ने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर महिन्यात नियोजित करण्यात आला असून ३ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे.

आजपासून रणजी क्रिकेट सामन्याला बारामतीमध्ये सुरुवात

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं. याच कारणासाठी BCCI ने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे.

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा