ऐतिहासिक निर्णय : यंदा लालबागचा राजा साजरा करणार नाही गणेशोत्सव !

’ सार्वजनिक मंडळाने यंदा साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ावर कोरानाचं संकट असल्याने यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने थेट गणपती बाप्पाची मूर्ती न बसवण्याचं ठरवलं आहे. त्याऐवजी 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवला जाणार आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 87 वे वर्ष. परंतु गणेशोत्सव मूर्ती स्थापना आणि विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करता “आरोग्य उत्सव” म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे.

मागील २४ तासांत राज्यात आणखी ६७ पोलीस करोना पॉझिटिव्ह

सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटात सापडला आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. ‘लालबागच्या राजा’ला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळाने परंपरेला छेद देत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.