Historical moment | भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास! सलग 7व्यांदा जिंकला आशिया कप

टीम महाराष्ट्र देश: भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आशिया खंडातील महिला क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कारण हरमन कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आशिया कप आपल्या नावावर केला. बांगलादेश मधील सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारतीय क्रिकेटर महिलांनी परत एकदा इतिहास रचला. सलग सातव्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कप आपल्या नावावर केला. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून 8 विकेटनी ही लढत जिंकली.

भारतीय महिला क्रिकेट संघाने सर्वप्रथम 2004 साली विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर आता यावर्षीही भारतीय महिला संघाची 8 वेळ आहे. 2018 मध्ये बांगलादेशचा पराभव करून भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कप आपला नावावर केला होता.

या अंतिम सामन्यांमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र भारताच्या गोलंदाजी समोर श्रीलंकेचा फज्जा उडाला. 20 शतकात श्रीलंकेने 9 बाद फक्त 65 धावा केल्या. भारतीय महिला क्रिकेट संघाची रेणुका सिंग हिन 3 षटकात 5 धावा आणि 3 विकेट घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड आणि स्नेहा राणाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. जिंकण्यासाठी डोळ्यासमोर 66 रनांचे लक्ष असताना भारतीय महिला संघाला 32 धावांवर पहिली विकेट बसली. यामध्ये शेफाली वर्मा 5 धावानंतर बाद झाली असून जेमिमा रॉड्रिग्ज फक्त 2 धावा काढून पवेलियनला परतली. यानंतर कर्णधार हरप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी भारताला जेतेपदाकडे नेले.

स्मृती मंधानाचे धडाकेबाज अर्धशतक

शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज बाद झाल्यानंतर स्मृती मंधानाने अर्धशतक केले. स्मृतीने 25 चेंडू मध्ये 51 भावांची नाबाद खेळी खेळली. तर हरमन कौरने 14 चेंडूत 11 धावा काढल्या. भारतीय महिला क्रिकेट संघाने 8.3 षटकात 2 गडी गमावून 71 धावा काढून हा सामना जिंकला.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.