‘हिट अँड रन केस’: गॉन गर्ल अभिनेत्री लिजा बेन्सचा मृत्यू

न्यूयॉर्क : गॉन गर्ल स्टार लिजा बेन्सचे निधन झाले आहे. या अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.

न्यूयॉर्क शहरामध्ये 4 जून रोजी लिसा यांना एका वाहनचालकानं जोरदार धडक दिली होती. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका लाल आणि काळ्या रंगाच्या दुचाकीनं त्यांना जोरदार धडक दिली. बेन्स यांना त्या अपघातात गंभीर दुखापत झाली होती. दुसरीकडे तो वाहनचालक फरार झाला होता. पोलीस अद्याप त्याचा शोध घेत आहेत. न्युयॉर्कमधील मॅनहॅटन याठिकाणी हा अपघात झाला होता.

“बेन्स यांच्या जाण्यानं आम्हाला अती दु;ख झाले आहे. बेन्स म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. त्यांचे जाणे आम्हा सर्वांसाठी मोठी हानी आहे. आयुष्याच्या शेवटपर्यत त्या कार्यरत होत्या. त्या उत्साही होत्या”. बेन्सच्या मृत्यूवर यांच्या नातेवाईकानं अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा