InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पोटनिवडणुकीत शिवसेना उदयनराजेंना साथ देणार? संजय राऊत म्हणाले….

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा सुरू होती. मात्र आज अखेर सातारा पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून ही निवडणूक विधानसभेसोबतच होईल, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

- Advertisement -

Loading...

युतीत सातारा हा मतदारसंघ याआधी आपल्याकडे असणारी शिवसेना भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या उदयनराजेंना पाठिंबा देणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

‘सातारा लोकसभेच्या विद्यमान खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ताणतणाव कशा करता करायचा. नंतर पाहूया. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत परत जागांचं वाटप होईल. मग साताऱ्याच्या बदल्यात काय घेता येईल ते पाहू. आधी उदयनराजे भोसले यांना निवडणूक लढवूद्यात. त्यांना जिंकून येऊद्यात. त्यानंतरचा निकाल आहे तो. सध्या निवडणुक तर होऊद्यात. ‘ही युती आहे, युतीमध्ये काय भूमिका असणार,’ असं म्हणत संजय राऊत यांनी या पोटनिवडणूक शिवसेना उदयनराजेंना समर्थन देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.