InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोहन भागवत ‘कुत्रा कोण आणि सिंह कोण?’ असदुद्दीन अोवैसींचा सवाल..

‘हिंदू समाजाने एकत्र यायला हवं, जर हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती करून शकेल’ असं म्हणताना मोहन भागवत यांनी ‘एखाद्या जंगलात जर सिंह एकटाच असेल तर जंगली कुत्री त्याच्यावर झडप घालतात आणि सिंहाला नष्ट करतात. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे’ असे विधान मोहन भागवत यांनी केलं होते.

त्यानंतर मोहन भागवत यांच्या या विधानाचा समाचार घेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन अोवैसीं यांनी संतप्त होऊन ‘कुत्रा कोण आणि सिंह कोण?’ असा सवाल केला. भारताच्या संविधानामध्ये सगळ्यांना माणूस मानलं आहे. कोणाला कुत्रा वा सिंह असे म्हटलेले नाही. आरएसएसचा संविधानावर विश्वास नाही ही त्यांची अडचण आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.