पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे?; नाना पटोले आक्रमक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान फिरोजपूर येथे त्यांची मोठी सभा होणार होती. पण या सभेला जाताना काही आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला अडवलं. पंतप्रधान मोदींचा ताफा जवळपास 15 ते 20 मिनिट घटनास्थळी थांबला होता. मोदींच्या सुरक्षेत मोठी ऋटी आढळल्याचं सुरक्षा रक्षकांना जाणवल्यानंतर त्यांचा ताफा परत माघारी गेला. या घटनेवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक पवित्र घेत भाजपावर हल्लाबोल केलाय. टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपाला चांगलाच धारेवर धरलय. पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी 15 दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते.

तसेच हे एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तसेच पुढे पत्रकार परिषदेत बोलताना शेतक-यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, घसरलेली अर्थव्यवस्था, जीवनाश्यक वस्तूंचे वाढलेले दर यामुळे देशातील जनतेमध्ये भाजपाविरोधात प्रचंड संताप आहे.

तसेच, तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून पंजाबातील शेतकरी एक वर्षापासून आंदोलन करत आहेत. आंदोलनादररम्यान 700 शेतक-यांचा मृत्यू असून शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळं पंजाबमधील त्यांच्या सभेला 500 लोकंही आली नाहीत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा