InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

होम मिनिस्टर पोहोचणार आता देशातील विविध शहरांत

- Advertisement -

आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर शो बघता बघता इतका प्रसिद्ध झाला आहे की नुकतेच या रिऍलिटी शो ने पूर्ण केला आहे 15 वर्षांचा यशस्वी प्रवास. रोजच्या दगदगीच्या आयुष्यात आनंदाचे आणि विरंगुळ्याचे चार क्षण एखाद्या गृहिणीला मिळावे या उद्देशाने सुरु केलेला हा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचलाच. आता मात्र सर्व गृहिणींचे हे लाडके भावोजी जाणार आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात.

- Advertisement -

Loading...

होम मिनिस्टर या शो चं नवं पर्व 1 जानेवारीपासून झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. हे पर्व देशभरातील विविध भाषा आणि विविध संस्कृती उलगडण्याचं काम करणार आहे. आणि विशेष म्हणजे या पर्वाचा पहिला भाग शूट होणार आहे देशाच्या राजधानी दिल्ली मध्ये. सध्या या एपिसोडचं शूट सुरु असल्याने होम मिनिस्टरची सर्व टीम दिल्लीत पोहोचली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.