सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जा.असे म्हणत मांजरी येथील हॉटेल मालक व शेतकरी संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्याने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवल्याचा प्रकार घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथे पंचायत समितीच्या आवारातच हा प्रकार घडल्याने सर्वांचा काही काळ गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनूसार सांगोला तालुक्यांमध्ये आज पंचायत राज समितीचे पथक दौऱ्यासाठी आले होते.

यावेळी हॉटेल चालक व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी गाडी मधून आमदार सदाभाऊ खोत खाली उतरताच ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु 2014 च्या निवडणुकीचे माझी अगोदर उधारी द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.’ असे म्हणू लागले

सदाभाऊंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात त्यांची चर्चा होत आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या हॉटेल प्रकरणानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीबाबत बोलताना ते म्हणाले, “सदाभाऊ खोत यांच्या जीविताला काही धोका आहे असं मला वाटत नाही. पण तरीही त्यांच्या तक्रारीनुसार मी राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी”, असं वळसे पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा