Homestay In Manali | मनाली ट्रिप अधिक स्वस्त बनवण्यासाठी ‘या’ होमस्टे मध्ये करा मुक्काम
टीम महाराष्ट्र देशा: देशात परतीच्या पावसाने माघार घेऊन सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान, देशातील अनेक पर्यटन स्थळी पर्यटक गर्दी करत आहे. कारण हिवाळा हा पर्यटकांना फिरण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने पर्यटक हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर उत्तर भारतातील राज्यात फिरायला जातात. यामध्ये प्रामुख्याने पर्यटक हिमाचल प्रदेश मधील मनाली Manali ला भेट देण्यात जातात. मनाली मध्ये होणारी बर्फवृष्टी Snowfall बघण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर जगभराततील पर्यटक मनालीला भेट देतात. मनालीमध्ये पर्यटक लॉन्ग विकेंड साजरा करायला जातात. त्यामुळे मनाली ट्रिपला जाताना आपल्याला सर्वात मोठा मुक्कामाचा प्रश्न उद्भवतो. कारण जास्त दिवस मनालीमध्ये राहायचे तर आपले ट्रीपचे बजेट वाढू शकते. त्यामुळे आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला मनाली मध्ये कमी किमतीत उपलब्ध असलेल्या होमस्टे Homestay बद्दल माहिती सांगणार आहोत.
नक्की काय आहे हे होमस्टे Homestay
आपण कुठेही फिरायला गेलो तर आपल्याला तिथे कुठे मुक्काम करायचा हा पहिला प्रश्न असतो. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हॉटेल्स आणि लॉज हे पर्याय समोर येतात. पण आता तुम्ही हॉटेल आणि लॉज बरोबर होमस्टे मध्ये देखील मुक्काम करू शकतात. हॉटेल्स पेक्षा कमी किमतीमध्ये तुम्ही होमस्टे मध्ये थांबू शकता. होमस्टे मध्ये तुम्ही काही दिवसांसाठी पेन गेस्ट म्हणून राहू शकतात. ते एखाद्या हॉटेल प्रमाणे नसून घरासारखे असते आणि घरामध्ये तुम्हाला राहण्यासाठी खोली उपलब्ध होते. तुम्ही जर मनाली फिरायला गेला तर तिथे तुम्हाला हॉटेल्स पेक्षा होमस्टे मध्ये राहणे नेहमी परवडेल.
मनाली मध्ये कमीत कमी किमतीत उपलब्ध असलेले होमस्टे
मनाली ट्राइब्स होमस्टे (Manali Tribes Homestay)
मनाली मध्ये प्रसिद्ध असलेले हिडंबा देवी मंदिराजवळ मनाली ट्राइब्स होमस्टे (Manali Tribes Homestay) आहे. मनाली मध्ये मुक्काम करण्यासाठी तुम्हाला हा एक चांगला पर्याय असू शकतो. इथे तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये रूम उपलब्ध होते. मनाली ट्राइब्स होमस्टे मध्ये तुम्हाला 550 रुपयांमध्ये एका रात्रीसाठी दोन लोकांसाठी सहज एक खोली मिळू शकते.
रॉयल होमस्टे मनाली (Royal Homestay Manali)
शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात असलेले रॉयल होमस्टे मनाली (Royal Homestay Manali) होमस्टे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. इथे तुम्हाला फक्त 500 ते 600 रुपयांमध्ये एका दिवसासाठी रूम बुक करता येऊ शकते. इथून तुम्हाला फिरण्यासाठी टॅक्सी पर्यायी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही इथे कोणत्याही काळजी शिवाय मुक्काम करू शकता. या होमस्टे साठी तुम्ही ऑनलाईन देखील बुकिंग करू शकता.
काफिला होमस्टे (Kaafeela Homestay)
मनाली मधील प्रमुख आकर्षण असलेल्या हिडंबादेवीच्या मंदिराजवळ काफिला होमस्टे (Kaafeela Homestay) आहे. इथून दिसणारे बर्फदृष्टीचे चित्र कुठल्या स्वर्गीय अनुभवापेक्षा कमी नाही. या होमस्टे मध्ये फक्त 600 रुपयांमध्ये रूम उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | “वेदांता प्रकल्प हातून गेला तेव्हाच आम्ही सांगितलं होतं…”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
- Eknath Shinde | राज्यातील तिसरा मोठा प्रकल्प गुजरातला गेला अन् एकनाथ शिंदे म्हणतात…
- Kisan Samridhi Kedra | किसान समृद्धी केंद्र द्वारे शेतकरी मिळवू शकतात अनेक सुविधा, जाणून घ्या
- T20 World Cup | फ्लॉप झालेल्या केएल राहुलऐवजी ऋषभ पंतला ओपनिंगची संधी? संघ प्रशिक्षकाची मोठी माहिती
- Eknath Shinde | “मी सगळ्यांना कामाला लावलं”, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.