InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अभिनंदनच्या वडिलांच देशवासियांना भावूक पत्र

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कंमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या वडिलांनी देशवासियांना उद्देशून भावनिक पत्र लिहिल आहे. अभिनंदनचे वडिल स्वतः भारतीय वायू दलातील निवृत्त एअर मार्शल आहेत.

अभिनंदन यांच्या वडिलांनी पत्रात लिहिले की, “मित्रांनो, तुमच्या काळजी आणि प्राथनांसाठी तुमचे आभार. मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिंवत आहे, जखमी नाही, मानसिक दृष्ट्या देखील ठीक आहे. तो ज्या साहसाने बोलत आहे….तो एक खरा सैनिक आहे… आम्हाला त्याचा अभिमान आहे.

तुमच्या  सर्वांचे आशिर्वाद त्याच्या डोक्यावर आहेत. त्याच्या सुखरूप परतण्यासाठी तुमच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहे. मी प्रार्थना करतो की, त्याचा छळ होऊ नये. आणि तो शरीर व मनाने सुखरूप परत परतेल. तुमच्या पाठिंब्यामुळे व उर्जेने आम्हाला बळ मिळालं आहे.”

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply