शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तासभर चर्चा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान!

पुणे : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीच्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही भेट राजकीय नव्हती असं सांगितलं आहे. ते पुण्यामध्ये आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

“प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत,” असं अजित पवार म्हणाले.

“पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीती आखण्याचं आणि राजकीय सल्ले देण्याचं काम सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी ही भेट नाही,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

प्रशांत किशोर हे सिल्व्हर ओक येथे पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दोघेही बंद दाराआड चर्चा करणार आहेत. प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा