“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य?”

मुंबई : पाच दिवसांपूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३५ घरे जमीनदोस्त झाली होती. दरडीखाली दबलेले ३२ मृतदेह काढण्यात आले. तसेच पावसाचा तडाखा बसल्याने बऱ्याच भागात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरात अनेक जण दगावले तर काही लोक अजूनही बेपत्ता आहे.या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत.

पावसाचा तडाखा बसलेल्या चिपळूण आणि महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाच्या दौऱ्यावर आहेत. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कोश्यारी करणार आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर जलमय झाले होते. कोश्यारी यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार देखील होते. त्यावरून आता राष्ट्रवादीने राज्यपालांवर टीका केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सोबत भाजपचे आमदार आशिष शेलार देखील आहेत. त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ‘राज्यपाल महोदय आज आशिष शेलार यांना तळीये गावात सोबत घेऊन का गेले असावेत?. राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर असताना सुद्धा भाजपचे आमदार सोबत घेऊन शासकीय दौरा करणे हे कितपत योग्य?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा