धीर तरी कसा देऊ, हातावर नोटा ठेवून उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडल्या

चिपळूण : इतर नेत्यांप्रमाणे आज शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणला भेट देत पूरपरिस्थितीची पाहणी केली. चिपळूणमधील पुरग्रस्तांचे हाल बघताना उर्मिला मातोंडकर यांनाअश्रू अनावर झाले. टीव्हीवर दाखवण्यात आलेली व्यथा बघून ज्या कुटुंबापर्यंत कोणीही पोहोचलं नव्हतं, त्या ठिकाणी जाऊन उर्मिला मातोंडकर यांनी त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली.

यावेळी बोलताना उर्मिला मातोंडकर यांचा अक्षरशः रडायला लागल्या. त्या म्हणाल्या, आताची परिस्थिती बघता, कोणाचाही धीर सुटेल अशी अवस्था झाली आहे. तुम्ही दाखवलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मी प्रार्थना करते, माध्यमांमुळे लोक इथे मदतीसाठी पोहोचतील. हे घर खरोखरच आतमध्ये आहे. कशी मदत पोहोचणार माहिती नाही.

मला विश्वास आहे, परमेश्वराने त्यांना वाचवलं, तर परमेश्वराला काळजी असेल, नक्की पुढची मदत होईल. मी स्वत: नेता नाही, पण आश्वासन दिले आहे. माझ्या परीने जी मदत होईल ती पूर्ण करेन, अजून काय करु. कोणी तरी पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे आहे, तीच मदत घेऊन मी आले, असं म्हणत उर्मिला मातोंडकर रडायला लागल्या.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा