आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं? बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं?

अहमदगर : संगमनेरमधील दंडकारण्य अभियान आनंद मेळाव्यानिम्मित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांचं कौतुकास्पद आहे. ते दोघे राज्याचं नेतृत्त्व करतात तसंच देशाचंही नेतृत्त्व करतील, अशा शब्दात दोन्ही युवा नेत्यांचं कौतुक बाळासाहेब थोरात केलं आहे. तसेच, थोरातांनी आदित्य ठाकरे यांना पर्यावरण खातं कसं मिळालं यासंदर्भात माहिती देखील दिली.

महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत आदित्य ठाकरेंशी मला चर्चा करायची होती. तेव्हा त्यांना मी विचारलं की तुम्हाला कोणतं खातं पाहिजे? तेव्हा त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन खातं घेतो, असं सांगितलं होतं. मुंबई महानगरपालिकेचं पर्यटन आदित्य ठाकरेंनी सुरू केलं. पर्यावरणाच्या बाबतीत झाडं, फुलं, पानं, फळ यांची आपल्यापेक्षा जास्त माहिती आदित्य ठाकरे यांना आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या कौतुकाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही स्वागत केले. मागील दीड दोन वर्षापासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत आहोत. आमच्यातील वातावरण विश्वासाचे असले पाहिजे. शिवसेना आपल्या पोटात कधीच काही ठेवत नाही. तसेच महाविकास आघाडी सरकार म्हणजे आमचे दूध आणि साखरे एवढे गोड संबंध आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा