सव्वादोन वर्षे मंत्रालयात न येणारे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये कसे आले?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

मुंबई : देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थान पटकावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॉप पाचच्या यादीत असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशननं हा अहवाल दिला आहे. प्रत्येक राज्याच्या लोकांचा कौल जाणून घेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास सांगितले होते.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानावर आहेत. मात्र यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे.

गेल्या सव्वादोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदाही मंत्रालयात पाय ठेवला नाही. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहे. मग कुठल्या निकषावर ते टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये आले? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. आजारपणामुळे ते लोकांसाठी गेल्या ८०-९० दिवसांपासून उपलब्ध नाहीत.

पंतप्रधानांनी बोलावलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीला ते उपस्थित झाले नाहीत. आणि मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमाला हजर झाले. कारण त्यांचा महाराष्ट्र फक्त मुंबई आहे. मुंबईबाहेरचा महाराष्ट्र त्यांना माहीत नाही. अशा परिस्थितीत ते चौथ्या क्रमांकावर कसे येऊ शकतात? असा सवाल करतानाच त्यांना क्रमांक मिळावा असेच निकष असतील असा चिमटाही काढला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा