मशिदीवरील भोंग्यांचा त्रास आताच कसा झाला? जलील यांचा राज ना सवाल 

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नवीन वाद सुरु झाला आहे. काल झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. त्यावेळी त्यांनी भारतातील  घुसखोरांसह मशिदीवरील भोंग्यांबद्दलही भाष्य केलं होतं.

अंडरवर्ल्डचा डॉन मन्या सुर्वे आहे माझा भाऊ , ‘या’ अभिनेत्याने केला धक्कादायक खुलासा !

‘धर्म प्रत्येकानं घरात ठेवायला हवा. मशिदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत. आमची आरती कोणाला त्रास देत नाही. पण नमाजाचा त्रास होतो. नमाज पठण करण्यास आमची हरकत नाही. पण भोंगे लावून कशाला?,’ असं राज म्हणाले होते . त्यांच्या या सवालाला ‘राज ठाकरे हे इतकी वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या कानांना आताच मशिदीवरच्या भोंग्यांचा त्रास व्हायला लागला का ‘ ,असा प्रतिसवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Loading...

… तरच मनसेला सोबत घेण्यासंदर्भात विचार करू : चंद्रकांत पाटील

‘शिवसेना आता धर्मनिरपेक्ष झाली आहे. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता हिंदुत्वाचा मुद्दा कोण हाती घेणार, असा प्रश्न होता. तो मनसेनं घेतला आहे. हे केवळ राजकारण आहे. त्यांना हे आधी का आठवले नाही,’ असं जलील म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.