गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई : गानसम्राज्ञी लात मंगेशकर यांना लवकर बरं वाटावं म्हणून त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. 8 जानेवारीला त्यांना निमोनियाचा त्रास होऊ लागल्याने मुंबईतल्या ब्रीचकँडी या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोरोनाची काही लक्षणं जाणवली त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.

मात्र त्यांचं वय 92 असल्याने त्यांच्या प्रकृतीच्या बाबतीत काळजीचा भाग म्हणून ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांची मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम काळजी घेत आहे आणि त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे , जिथे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांची काळजी घेतली जात आहे.

ब्रीच कँडी रूग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ANI ला हे सांगितलं आहे की, ‘लता मंगेशकर यांच्यावर अजूनही आयसीयूमध्येच उपचार सुरू आहेत. आम्ही कसोशीचे प्रयत्न करून त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यांचीच ही इच्छा आहे की लता मंगेशकर यांना लवकर बरं वाटलं पाहिजे. अनेक चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते आहे.’ डॉ. प्रतीत समदानी यांनी हेदेखील सांगितली की लता मंगेशकर यांना असं वाटतं की त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती किंवा त्याविषयीची चर्चा फार होऊ नये.

 

 

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा