अजित पवारांवर बोट दाखवणाऱ्या भाजपने स्वत:च्या मंत्र्यांवर किती खर्च केला?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याच्या प्रचार व प्रसारासाठी जो खर्च होणार आहे त्याकडे जे बोट दाखवत आहेत त्यांनी स्वतः सत्ता असताना किती खर्च केला याकडे लक्ष द्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याच्या प्रचार व प्रसारावर ६ कोटी रुपये खर्च होत आहेत असा आरोप होत असून त्यावर नवाब मलिक यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

सरकारमध्ये काम करत असताना प्रचार व प्रसार, माहिती देणे गरजेचे असते पण ६ कोटी रुपये खर्चावर जे लोक बोट ठेवत आहेत त्यांनी त्यांच्या सरकारमधील मुख्यमंत्री व प्रत्येक मंत्र्यांवर किती पैसे खर्च केले यावर लक्ष द्यायला हवे असेही नवाब मलिक म्हणाले.

केंद्रसरकार व भाजपशासित सरकारे प्रचार व प्रसारासाठी वारेमाप खर्च उधळपट्टी करतेय त्या तुलनेत जास्त नाही हे विरोधकांना कळलं पाहिजे अशा शब्दात नवाब मलिक यांनी सुनावले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा