माय मराठीला विरोध करून आणखी किती ‘जलील’ होणार?; रुपाली पाटलांचा सणसणीत टोला

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा मोठा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा लहान असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक असणारा आहे.

यावरून आता सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर आता यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. असे का होते की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. तसेच मराठी पाट्यांचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी देखील जलील यांनी केली होती.

यानंतर जलील यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसत आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीनेही जलील यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी ही आता यावर उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्यांची जलील यांना काय अॅलर्जी आहे? माय मराठीला विरोध करून आणखी किती जलील होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा