InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदींना काय माहीत कुटूंब कसे चालवतात? पवारांचे सडेतोड उत्तर

पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात झालेल्या त्यांच्या सभेत पवार कुटूंबावर जोरदार टीका केली आहे. पवार कुटूंबामध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे मोदी म्हणाले होते. तसेच आजच्या अकलुजच्या सभेत देखील मोदींनी पवारांनी यशंवतराव चव्हाण यांच्या कुटूंबाकडून प्रेरणा घ्यायचा सल्ला देखील दिला. आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतित्तर दिले आहे.

मोदी सातत्याने म्हणत आहेत की, शरद पवार चांगले व्यक्ती आहेत. पण त्यांच्या घरात कलह सुरु आहे. पवारांचा पुतण्या त्यांच्या हाताबाहेर गेला आहे. पण माझ्या घरातील प्रश्नांवर त्यांना काय करायचे आहे, असा सवाल पवारांनी विचारला. मोदींच्या टीकेवर विचार करताना माझ्या लक्षात आले की मी माझी पत्नी, मुलगी, जावई आणि नातवंडासोबत राहतो. पण त्यांना यापैकी कोणीच नाही. मोदींना दुसऱ्यांच्या घरात काय चालले आहे हे पाहण्याची काय गरज आहे. यासंदर्भात खालच्या पातळीवर यायचे नसल्याने मी अधिक काही बोलणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply