HSC/SSC Re-Exam | दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा होणार ‘या’ तारखेपासून, पाहा वेळापत्रक

HSC/SSC Re-Exam | टीम महाराष्ट्र देशा: इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालानंतर विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेची वाट बघत आहेत. विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा संपलेली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

10th/12th re-examination time able is available on the website of the board

महाराष्ट्र बोर्ड दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीमध्ये पार पडणार आहे. तर बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. दहावी बारावीच्या री-एक्झामिनेशन संपूर्ण वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी http://www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र बोर्ड दहावी आणि बारावी लेखी फेरीपरीक्षा छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई, लातूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले वेळापत्रक हे फक्त विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळा आणि कॉलेजमध्ये छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक मिळेल.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WTbx6d