HSC & SSC Results | दहावी-बारावीच्या विद्यार्थांची प्रतिक्षा संपणार! तर ‘या’ दिवशी लागणार निकाल

Maharashtra State Board Results 2023 : प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील साधारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच बारावी आणि मार्च महिन्यापासून इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. आता विद्यार्थी पालकांच लक्ष लागलं आहे ते म्हणजे निकालाकडे. तर आता नुकतीच याबाबत माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालाची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

तसचं इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर,जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती देखील अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यामुळे आता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेटू देऊन निकाल पाहता येणार आहे.

दरम्यान, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर पुढे बारावी (HSC) आणि दहावी (SSC) पैकी अपेक्षित पर्याय निवडावा. पुढे हॉलतिकीट क्रमांक आणि इतर माहिती भरून सबमिट केलं की, काही क्षणांतच निकालाचे आकडे तुमच्यासमोर असतील. यामध्ये पुढीलपैकी कोणत्याही लिंकवरून निकाल पाहता येणार आहे. यामध्ये https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळासोबत विद्यार्थी किंवा पालक mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या लिंकवर जाऊन निकाल पाहू शकतात.

महत्वाच्या बातम्या-

 

 

You might also like

Comments are closed.