‘त्याच्या अश्लील चित्रपटात काम केल्यामुळे नवऱ्याने घटस्पोट दिला’; राज कुंद्रा प्रकरणी मॉडेल निकिताचा धक्कादायक खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मीती प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन माहिती समोर येत आहे. यातच आता निकिता फ्लोरा सिंग या मॉडेलने तिला आलेल्या ऑफरबरोबरच राज कुंद्रांच्या या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी शुटींग केल्याने एका मुलीला तिच्या पतीने घटस्फोट दिल्याचा दावा केलाय.

पूनम पांडे, सागरिका शोना यासारख्या मॉडेल्सने मागील काही दिवसांपासून राज कुंद्रांच्या या अश्लील चित्रपट निर्मितीच्या उद्योगांसंदर्भात गंभीर आरोप केल्याचं दिसून आलं. याच प्रकरणासंदर्भात आता निकिता फ्लोरा सिंग या मॉडेलने ट्विटरवरुन राज कुंद्रांनी आपल्यालाही हॉटशॉट्ससाठी ऑफर दिली होती, असं म्हटलं आहे.

कुंद्रा प्रकरणामध्ये न्यूड ऑडिशनसंदर्भातील माहिती समोर येत असल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत निकिताने एक ट्विट केलं आहे. “नोव्हेंबर २०२० मध्ये उमेश कामतने मला राज कुंद्राच्या हॉट्सशॉट्स या अ‍ॅपसाठी न्यूड शूट करण्याची ऑफर दिलेली. कामतने मला दिवसाला २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शवलेली. देवाचे आभार आहेत की मी या मोठ्या नावाला भुलले नाही.”

पुढे ती म्हंटली की, “मात्र झारखंडमधील माझ्या एका ओळखीच्या मुलीला तिच्या पतीने घटस्फोट दिला होता. तेव्हा त्याला कळलं की तिने यासाठी शूट केलं आहे,” असं निकिताने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा