नुसरत जहांच्या प्रेग्नन्सीवर पती निखिल जैनने केला मोठा खुलासा

पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां प्रेग्नंट असल्याची माहिती काही दिवसांपासून समोर येत होती. त्यानंतर नुसरत जहां यांच्या प्रेग्नेंसी आणि नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगत आहे. पण याबद्दल त्यांच्या पतीला माहिती नसल्याने बोलले जात होते. यावर आता नुसरचे पती निखिल जैनने एक मोठा खुलासा केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार यश दासगुप्तासोबत वाढलेली जवळीक यामुळे नुसरत जहांच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. यशला लोक नुसरतच्या मुलाचा बाप मानत आहेत. नुसरत लवकरच निखिलला घटस्फोट देणार असल्याचं देखील कळत आहे.

यावर निखिल जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार नुसरत त्याचं लग्न आता संपू शकतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नुसरत यांनी पतीचं घर सोडलं आहे. त्या सध्या त्यांच्य आई-वडिलांसोबत राहतात. माझ्या घरच्यांना व मला नुसरत गरोदर असल्याची काही कल्पना नाही, असे निखिलने स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा