‘मी कायम अजित पवार आणि राष्ट्रवादीसोबत’; महाविकास आघाडीलाच मत देणार…

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत ९ मते फुटल्याची चर्चा होती. ज्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट आमदारांची नावं घेत त्यांनीच दगा दिल्याचा आरोप करुन एकच खळबळ उडवून दिली होती.

यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, अशी माहिती राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. यानंतर विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र भुयार यांनी एक अजब प्रस्ताव मांडला आहे.

देवेंद्र भुयार मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले कि, मी मतदान करताना संजय राऊत माझ्या टेबलाच्या समोर उभे राहतील. मी त्यांना मत दाखवून मतपेटीत टाकेन. तसेच पुढे हे शक्य नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे विधानपरिषदेत मतदाना करण्याचा माझा अधिकार संजय राऊत यांनाच देऊन टाकावा. ते त्यांच्याच हाताने मतपेटीत मत टाकतील.

यानंतर आता भुयार यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी माझ्याशी अद्याप काँग्रेसने संपर्क केलेला नाही. मात्र, मी कायम अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असून विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूनेच मतदान करणार असल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र भुयार यांनी दिले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा