राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांकडून मला धोका आहे : सदाभाऊ खोत

मुंबई : हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जा.असे म्हणत मांजरी येथील हॉटेल मालक व शेतकरी संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्याने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवल्याचा प्रकार घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथे पंचायत समितीच्या आवारातच हा प्रकार घडल्याने सर्वांचा काही काळ गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनूसार सांगोला तालुक्यांमध्ये आज पंचायत राज समितीचे पथक दौऱ्यासाठी आले होते.

आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली असता हा प्रकार घडला. यावेळी सदाभाऊ गाडीमधून उतरताच मांजरी ( ता. सांगोला ) येथील हॉटेल चालक व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी गाडी मधून आमदार सदाभाऊ खोत खाली उतरताच ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु 2014 च्या निवडणुकीचे माझी अगोदर उधारी द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.’ असे म्हणू लागले

सदाभाऊंसोबत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात त्यांची चर्चा होत आहे. आता यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीकडून सततच्या होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचेची यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांकडून मला धोका आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा