‘मी मोठी नेता नसल्याचं पवारसाहेब म्हणाले मी त्यांच्या बोलण्याने लहान होत नाही’ : पंकजा मुंडे

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेB यांनी नुकताच दसरा मेळावा पार पडला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार पारिषदेत प्रश्न विचारला असता पवारांनी मी बोलावं एवढया त्या मोठ्या नेत्या नसल्याचं म्हटलं. यावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मी पवार साहेबांचं वक्तव्य मोबाईलवर पाहिलं. मी मोठी नेता नाही, हे त्यांचं वक्तव्य बरोबर आहे. मी एक लहानच नेता आहे. परंतु मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे.’

पुढे त्या म्हणाल्या, ‘तरी देखील पवार साहेब मला असं म्हणाले असतील तर मी त्यांच्या बोलण्याने लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तेवढीच राहणार आहे. पवारसाहेब आमच्यापेक्षा नक्कीच मोठे आहेत त्यात काही वाद नाही’, असं देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा