निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही ; रोहित पवारांचे प्रत्युत्तर

गेले काही दिवस भाजपचे युवा नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवर वाकयुद्ध रंगलं आहे. ते वाकयुद्ध शमणार असं वाटत असतानाच आता ‘निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही,’ असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.

3 तारखेनंतर काय करायचं..; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

भरलेलं भांडं आणि मोकळं भांडं यामध्ये मोकळ्या भांड्याचा आवाज जास्त येतो. धमकीला मी अजिबात घाबरत नाही. शेवटी फक्त खोकल्या धमकीला कोण घाबरतो??, अस रोहित पवार म्हणाले.

Loading...

मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाही ; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

राष्ट्रवादीतल्या बऱ्याचश्या नेत्यांनी मला सांगितलं की अश्या लोकांच्या नादी लागून उगीच वेळ जातो. त्यापेक्षा त्यांच्या नादी लागयचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.