‘कोण काय बोलतंय त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही’; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावला होता. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“ज्या संधी मुख्यमंत्र्यांना आहेत, त्या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेता व्हावं असं राऊतांना वाटत असेल, तर ते चांगलंच आहे. मुख्यमंत्र्यांनी नक्की मोठा राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठा नाही, असं राऊतांना वाटतं, असा टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला होता. त्यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे.

कोण काय बोलतंय त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. मी काय बोलतोय हे आधी त्यांनी समजून घ्यावं. या देशात एकापेक्षा अधिक नेते असू शकत नाही का?, या देशात अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे नेते होते. बाळासाहेब ठाकरे होते. अनेक मोठे नेते देशात काम करू शकत नाही का?, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा