“मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही, त्याचं मला फार दु:ख वाटत नाही”

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ते म्हणाले होते कि, ‘मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे कारण जनता मला तेवढं प्रेम देत आहे’. यानंतर आता याबद्दल पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही. त्यामुळे मी त्याची फार आठवण काढत नाही, असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काढलं आहे. आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच मला वाटतंय, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर पंकजा यांचं हे विधान आल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘सत्तेत नाही याचं दुख नाही. सत्तेत जनता असली पाहिजे. सत्तेच्या खूर्चीवर कोण व्यक्ती आहे याला महत्त्व नाही. त्याची प्रवृत्ती काय याला महत्त्व आहे. मी कोणत्या मंत्रीपदावर नाही याचं मला दु:ख नाही. त्यामुळे मी त्याची फार आठवण काढत नाही. मी या पदावर नाही… त्या पदावर नाही… पण माझ्या हातात असतं तर मी केलं असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा