InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अजून मी म्हातारा झालेलो नाही, मोदी सरकारला खाली बसवल्याशिवाय मी थांबणार नाही – शरद पवार

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना पवार म्हणाले की, मी अजून म्हातारा झालेलो नाही, मोदी सरकारला खाली बसवल्याशिवाय मी थांबणार नाही, त्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

शेतकरी प्रश्नावरूनही पवारांनी नरेंद्र मोदी हे शेती प्रश्नावर अपयशी ठरले असल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका केली.  पवार म्हणाले, भाजपवाले म्हणतात की तुम्ही शेतमाल पिकवणाऱ्यांचा विचार करतात खाणाऱ्यांचा नाही. पण खाणारा जगवायचा असेल तर पिकवणारा जगवायला पाहिजे, असे पवार यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून पवार यांच्या विधानाचे स्वागत केले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply