“मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे”

कोल्हापूर : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, मी पॅकेज जाहीर करणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी यापूर्वीही सांगितलं आहे की, मी सवंग लोकप्रियतेसाठी कुठलीही घोषणा, पॅकेज जाहीर करणार नाही. पण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. तसंच त्यांना धीर देत मदतीचं आश्वासनदेखील दिलं. कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको. मी स्वत: आज शाहूपुरी येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि बोललो.

मुंबईत आम्ही परत एकदा सर्वांना बोलावून पूरपरिस्थितीत सर्वांना कशी मदत करता येईल ते पाहू, मी इथे आलो आहे तर प्रशासनही आमच्याबरोबर गुंतले आहे. माझी विनंती आहे की, कुणी आता पूरग्रस्त भागाचा दौरा करून प्रशासनाला अडकवून ठेवू नये. एनडीआरएफचे निकष २०१५ चे आहेत, ते बदलण्याची गरज आहे, अशी आम्ही केंद्राला विनंती केली आहे. मी वेड्यावाकड्या मागण्या केंद्राकडे करणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा