“मी डंके की चोटपर सांगतोय, शरद पवारांनी विश्वासघात केला”

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक बैठक घेतली असून त्यात काही पर्याय सूचवले होते. याआधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. राज्य सरकारने जी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती ती सरकारने पगारासाठी मदत केली होती.

तसेच, पाच राज्यांच्या वेतनाचा विचार केला तर गुजरातमधील वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे आणि इतर राज्यात जास्त आहे. तसेच एसटीच्या विलिनीकरणावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी उत्तर देणं टाळलं. अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला आहे.

यानंतर सरकारच्या या निर्णयानंतर आता अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी कष्टकरांच्या विश्वासघात केला आहे, हे मी डंके की चोटपर सांगतो, असा आरोप ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर आता कामगारांना तोडण्याचे काम शरद पवार यांच्या टोळीने केले आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पगारवाढ जाहीर केली. हे करताना सरकार किती चुकीचे असू शकते याचे मूर्तीमंत उदाहारण ही पत्रकार परिषद होय. पगारवाढ देताना ते म्हणाले की पगार वेळेत होत नव्हते, पगार न देणारे सरकार किती खोटे आहे हे आज उघड झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा