InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

पवारांच्या भेटीबाबत खडसेंनी केला खुलासा; खडसे म्हणाले….

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाराजीनाट्य लवकरच नवे वळण घेण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांच्यासोबत पक्षातील लोकांनीच दगाफटका केल्यामुळे एकनाथ खडसे प्रचंड नाराज आहे. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे मांडायला सुरुवात केल्यानंतर दिल्लीतील नेतृत्वाने सोमवारी खडसे यांना बोलावून घेतले होते.

या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. खडसे यांनी सोमवारी रात्री उशिरा प्रसारमाध्यमांशी पुन्हा संवाद साधला. मी आजतरी भाजपमध्येच आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या मतदारसंघातील काही प्रकल्पांची चर्चा करण्यासाठी मी पवारांना भेटलो होतो. आज मी उद्धव ठाकरे यांनाही भेटेन. परंतु, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी आज भारतीय जनता पार्टीत आहे, असे खडसे यांनी सांगितले. त्यामुळे खडसे यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे

Loading...

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.