‘मी कणखर आहे, पुन्हा नव्यानं सुरुवात…’; पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीची प्रेरणादायी पोस्ट

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांचे ३० जून २०२१ रोजी निधन झाले. राज यांच्या अचानक जाण्यामुळे मंदिरा अस्वस्थ पडली होती. परंतु आता या दुःखातून मंदिरा हळूहळू सावरत आहे.

राज यांच्या निधनानंतर मंदिराने सोशल मीडियावर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून ती स्वतःलाच प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहे. तिने लिहिले आहे, ‘मी सक्षम आहे. माझ्यात क्षमता आहे. अनेकजण माझ्यावर प्रेम करतात. मी कणखर आहे. आता नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे…’ असे म्हणत तिने My #dailyaffirmation असा हॅशटॅग दिला आहे.

मंदिरा आणि राज यांनी १४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाला जरी २३ वर्षे पूर्ण झाली असली, तरी ते एकमेकांना २५ वर्षांहून अधिक काळ ओळखत होते. त्यांचे २५ वर्षांचे हे नाते खूप सुंदर आणि प्रगल्भ असे होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा