‘पूरग्रस्त भागातील दौरे टाळा, या पवारांच्या अवाहनावर फडणवीस म्हणाले, मी तर विरोधी पक्षनेता’

मुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि इतर भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेते पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणालेत मदतकार्यात गुंतलेल्या यंत्रणेवर ताण पडू नये म्हणून राजकीय नेत्यांनी सध्याच पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत.

पत्रपरिषदेत पवार म्हणालेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचे मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होते म्हणून माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवे, असे मला वाटते.

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रितिक्रिया दिली आहे. राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागत असल्याचं शरद पवार म्हणाले होते. यावर, मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे, असं फडणवीस म्हणाले.

आमचे दौरेही महत्त्वाचे आहेत कारण आम्ही गेलो तरच शासकीय यंत्रणा जागी होते आणि कामाला लागते. पवारांच्या आवाहनाचा अर्थ एवढाचा घ्यायला हवा की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यासोबतच फडणवीसांनी आपण येत्या तीन दिवसाता दौरा करणार असल्याचंही म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा