मी देशातील सर्वात शक्तिशाली महिला आहे : कंगना रनौत

मुंबई : सध्या देशात अनेक वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आता एका नव्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरून कंगनाला तशी धमकी देण्यात आली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि ट्विट्समुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या कंगनाला आता सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने, तिने याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली असून, धमकी देणाऱ्याविरोधात फिर्याद नोंदवली आहे

यानंतर आता कंगनाने आणखीन एक मोठं वक्तव्य केलय. ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यापासून कंगना तिच्या इंस्टाग्रामवर चांगलीच एॅक्टीव्ह झाली आहे. कंगनाने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एएनआयने दिलेल्या वृत्ताचं ट्विट शेअर केलं आहे. हे ट्विट शेअर करत कंगनाने स्वत:ला देशातील सर्वात शक्तिशाली महिलेची उपाधी दिली आहे.

कंगनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत कंगनाच्या सर्व सोशल मीडिया पोस्टवर भविष्यात सेन्सॉर करण्याची मागणी केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही याचिका दाखल केली असल्याचं एएनआयने या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा